"राष्ट्रवादीचा इनकमिंग सपाटा चालुच "
*"राष्ट्रवादीचा इनकमिंग सपाटा चालुच "*
*मालवण तालुक्यातील समाजसेवक व युवा नेतृत्व उद्या हाती बांधणार 'घड्याळ'*
----------------------------------------
*असीम वागळे- सावंतवाडी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक व चिपळूणचे आमदार सन्माननीय शेखर निकम साहेब प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे उद्या शनिवार दिनांक २१/ ०८/ २०२१ रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कुडाळ एमआयडीसी येथील वासुदेवानंद हॉल (आर. एस .एन. हॉटेल) येथे उपस्थित रहाणार आहेत. तरी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थित आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आँनलाईन उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मालवण तालुक्यातील युवा व समाज सेवक नेतृत्व प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी बैठक कुडाळ येथील हॉटेल आर.एस.एन मागे वासुदेवानंद हॉल येथे सकाळी १० वा. होणार असून यावेळी मालवण तालुक्यातील राजकारणापासून आतापर्यंत अलिप्त असलेला नेहमी समाजसेवे मध्ये अग्रेसर असणारे व तरुण असे नेतृत्व आपल्या अनेक तरूण सहकार्यांसोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.
या चेहऱ्यामुळे मालवण तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे मालवण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे या पक्ष प्रवेशाकडे लक्ष लागले आहे.तसेच तरी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थित आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आँनलाईन उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्ह्य़ातील युवा व समाज सेवक नेतृत्व प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.या चेहऱ्यामुळे मालवण तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे मालवण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे या पक्ष प्रवेशाकडे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment